मराठी-ई-अर्टिकल या मराठी ब्लॉगवर आता आपणही व्यक्त होऊ शकता व्यक्त होण्यासाठी लेख, अग्रलेख, कविता, चारोळी ईत्यादींचा समावेश असेल.

Sunday, March 3, 2019

गाजरांचा पाऊस!

  गाजरांचा पाऊस! शीर्षक बघुनच अनेकांच्या भुव्या निश्चितच उंचवल्या असतील! कारण ते एक अतिशाेक्तीच उदाहरण आहे. या ठिकाणी त्याचा शब्दशहा अर्थ न घेता त्या मागील औपचारिक मुख्य संकल्पणा लक्षात घ्यावी, जरी आपल्याला लाेकशाहीने विचाराचे व बाेलण्याचे मुक्त स्वातंत्र्य दिले असले, तरीही काही बाबीचां जाणीवपूर्वक अनौपचारिक रित्या उल्लेख करावा लागताे नाहीतर "कन्हैया कुमार" हाेताे! असाे. त्याचा पुढे स्पष्ट उलगढा हाेईलचं.
       अठराव्या शतकाच्या मध्यापासुन इंग्रजांनी भारतात पाय राेवण्यास सुरवात केली त्यांनीही भारतीयांना प्रथम व्यापारी वखारी स्थापणेचे एक प्रकारचे गाजरच दाखवले हाेते, पुढे अनेक शतके काय झाल ते आपण सर्वजन जाणुन आहाेत. आता तूम्हांला 'गाजर' या शब्दाची संकल्पणा लक्षात आली असेलच! अनेक खाेटी आश्वासनं, लुट, छळ करुन ब्रिटिशांनी भारतावर हुकुमशाहीने राज्य केलं, अाणि अगदी त्यांच्या प्रमाणेच 'गाजर' या संकल्पणेचा वापर भारतात स्वातंत्र्यापासुन ते आजपर्यंत भारतीय राज्यकर्ते 'लाेकशाहीच लेबल' लावुन करत आलेत, आणि करतायेत. मग सरकार कुणाचही असाे!
     गंमत बघा निवडणुका जवळ आल्या की विकास कामांना जरा जास्तच वेग येताे! शहरापासुन ते खेड्या-पाड्या पर्यंत विविध भागांचे दाैरे हाेतात, माेठ-माेठ्या जाहीर सभा हाेतात, सभेतील भाषनात अक्षरशहा 'गाजरांची गारपीठच'(खाेटी आश्वासने) हाेते!  पुढे "निवडणूक आचारसंहिता" लागण्यास थाेडेच दिवस शुल्लक राहिलेले असतात, तेव्हां घाई-घाईने गरज पडल्यास सरकारी हेलिकाॅप्टर(चाेपर) वर स्वार हाेऊन पुढारी नेते अगदी दुर्गम भागात आभाळातुन खाली उतरुन लाेकांना दर्शन देतात! खरं म्हणजे सरकारी हेलिकाॅप्टर हे लाेकांच्या कररुपी पैशावरच आभाळात उडत असतात, तरीही नागरीक त्याला बघण्यास गर्दी करतात हे विशेष! या ठिकाणी विविध "गाजर विकास कामाचे" उदघाटन समारंभ माेठया थाटात उरकुन पुढारी नेते माेकळे हाेतात!  त्यात मग जुन्याच रस्तत्यावर नवीन रस्ते ऊभारणीच्या पाट्या लावुन नारळ फाेडणार, खुप झाले तर शंभर-दाेनशे मिटर अंतरापर्यंत माेठ माेठी दगडे व काही प्रमाणात डाबंर अंथरुन काम चालु केले अस दाखवणार!  कामाचे उदघाटन साेहळा तर किलाे मीटर मध्ये झालेले असताे, परंतु प्रत्यक्षात काम काही मिटरवरच झालेले असते!  ताे पर्यंत इकडे निवडणूक आचारसंहिता लागु हाेते आणि विकास कामे जिथल्या तिथे ठप्प हाेऊन जातात. मग काय..? ताे पुढारी नेता निवडुन आला काय..किंवा नाही काही फरक पडत नाही! रस्तत्यावरील ते टाकलेले खडी, डांबर पुढील पाच वर्ष इकडून-तिकडे खेळत असतात! आणि उदघाटन पाट्याचां कलर ऊडालेला असताे! पुन्हां पाच वर्षांनी त्यालाच नवीन रंग मारुन पुढे निरंतर हिच प्रक्रिया चालु राहते.
   शेतकरी बांधवांना माेठ माेठी गाजर दाखवायची(हमी भाव) मुबलक वीज पुरवठा, पाणी, माेठी बाजारपेठ, परंतु प्रत्यक्षात काहीच नसते. प्रत्येकाला राेजगार, रस्ते शेतकर्यानां हमी भाव, व्यापाराची भरभराट, प्रत्येकाला घर, संपूर्ण गरीबी निर्मुलन, सर्वांना शिक्षण, चांगली मुबलक आराेग्य सुविधा, विविध आरक्षण...ईत्यादी वर्षान वर्षे दाखवत आलेले गाजरांचे काही उत्तम उदाहरणे आहेत. अगदी अलीकडील काही 'नवीन गाजर' प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये, १००% भ्रष्टाचार मुक्त भारत!, काळा पैसा(धन) देशात परत आणनार! वगैरे.. तसे पाहता अशी गाजरे(आश्वासने) खुप आहेत ती सर्व या ठिकाणी सांगीतली तर भारत देश इकडेच महासत्ता हाेईल! गाजरांचा पाऊस फक्त भारतातच पडताे असे मी मुळीच म्हणनार नाही, संपुर्ण जगात ताे पडताे, फरक एवढाचं त्याचे प्रमाण कमी-जास्त असु शकते!
                                                                              ✒ सतीश इंगळे.



                   Article by Satish Ingle.
                            


Monday, December 10, 2018

"मेरा देश बदल रहा हैं...आगे बढ रहा हैं"

      रविवारचा दिवस हाेता, थाेडा विरंगुळा म्हणुन मी FM (Frequency Modulation) ऐकायला घेतला. अनेकांना 'फुल फाॅर्म' माहीत नसेल म्हणुन वरील कंसात त्याचा उल्लेख केला. असो, माझा अर्थातच म्हणजे संगीत ऐकण्याचा महत्वाचा उद्देश हाेता. परंतु मला लगेच एक जाहिरात इच्छा नसुनही पूर्णपणे ऐकावीच लागली! एक मात्र खरं आहे या जगात 'फुकटात' काहीच मिळत नाही! हो! असाे, पुढील पाच ते दहा मिनिटे विविध जाहिराती एकामागुन एक धाड-धाड कानावर आदळत हाेत्या! मी थाेडा आवाज कमी केला, नशीब तेवढातरी पूर्ण अधिकार आपल्याला आहे! तेवढ्यात पुढे संगीतमय काहीतरी ऐकायला आलं, बहुदा गांण लागतं कि काय! असं समजुन मी आवाज पुर्णपणे वाढवला, आणि सुरु झालं "मेरा देश बदल रहा हैं...आगें बढ रहा हैं" अशा प्रकारच एक संगीतमय गाणं! गाणं कसलं! ती तर सत्तारुढ शासनाच्या पक्षाची एक जाहिरात हाेती.
      आणि ही संगीतमय जाहीरात ऐकुन माझ्या डाेळ्यासमाेर देशाचे चालु वर्तमानाचे चित्र ऊभे राहिले! आणि त्यातील भेडसावणारा असंख्य प्रश्नांचा राक्षस! कदाचित माझ्याप्रमाणेच ही जाहिरात देशातील प्रत्येकांने कुठे तरीे ऐकली असेल! असं मी समजताे, आणि मुख्यविषयाकडे जाताे. खरचं आपला देश बदलताेय का? आणि पुढे जाताेयं का..? ऐकेकाळी जगात भारताला 'साप पकडणारा देश' म्हणुन संबाेधले जायचे पुढे त्याच देशाचे "डिजीटल इंडियात" रुपांतर झाले, डिजीटल चे लेबल लावुन भारत देश 'प्रतिगामी कात' टाकुन जगाबराेबर  चालण्याचा 'पुराेगामी भास' दाखवताेय खरा! परंतु  इथे बदल झाला ताे फक्त शब्दांचा, विचारांचा नाही. म्हणजे बघाना आत्ताची दु:खद घटना 'बुलंदशहर'- उत्तरप्रदेश मध्ये एका गाेहत्तेच्या कारणावरुन जमावाने पोलीस स्टेशनवर हल्ला करुन एका निष्पाप कर्तव्यदक्ष प्रामाणिक वरिष्ट निरीकक्षकाला(PI) गंभीर जखमी करुन मृत्यूमुखी पाडलं, विशेष म्हणजे कर्तव्य बजावत असतानाच अधिकार्याच्या मृत्युदेहाला एक सन्मान म्हणुन देशाचा राष्ट्रधव्ज तिरंगाही मिळु नये! आणि शाेकांतिका अशी आहे की, मद्य पिऊन नशेत एक सिनेअभिनेत्री अंघाेळीच्या टब मध्ये ताेल जाऊन बुडुन मरते तिला मात्र तिरंग्यात लपेटलं जातं! हा विरोधाभास समजने कठीण असाे, मागील काही दिवसापुर्वीची बुलंदशहर घटना म्हणजे १९२२ मधील असहकार चळवळी दरम्यान घडलेली "चाैरीचाैरा घटणेची" पुनरावृत्तिच म्हणावी लागेल! याेगायाेग दाेन्हीं घटना उत्तरप्रदेश मधीलच! परंतु १९२२ मधील चाैरीचाैरा घटना वेगळी आणि २०१८ मधील स्वतंत्र भारतातील ही घटना वेगळी. १९२२ मधील घटना "स्वातंत्र्य चळवळीशी" संबधीत हाेती, तरीही ती हिंसक घटना असल्याकारणाने पितामाह "महात्मा गांधीजीनी" चळवळ मागे घेतली हाेती. २०१८ मधील  'बुलंदशहर'- उत्तरप्रदेशातील घटना ही विशिष्ट धर्माशीच संबधीत आहे! यात अजिबात शंका नाही. परंतु हे देशाच्या दृष्टिने अतिशय घातक आहे. परंतु १९२२ ला प्रत्यक्ष महात्मा गांधीजी अस्तित्वात हाेते, म्हणुन ते थांबवता आलं! आणि आज "महात्मा गांधीजीच्या चष्म्याचा वापर करुन खाेट्या जाहीराती!" अस्तित्वात आहेत! म्हणजे सर्व 'राजकारण मंगलमय' आहे. देशातील काही जातीयवादी संघटनांना जिवंत माणसांपेक्षा प्राणी महत्वाची आहेत! असच म्हणावं लागेल! यालाच आपण "देश बदलताेय...पुढे जाताेय..." अस म्हणायचं का?
       आज भारताने विज्ञानाच्या माध्यमाद्वारे मंगळ, चंद्र ग्रहा पर्यंत झेप घेतली व जगात वाहवाह मिळवली! त्याच भारतात अंधश्र्दाच्या दृष्टिकाेनातुन मुला-मुलीला केवळ मंगळ आहे म्हणुन, आपण लग्न जमवत नाही! काय तर म्हणे काेप हाेईल! अजून किती दिवस आपण अंधश्र्देच्या कुबड्या वापरणार आहाेत? जगात असा ऐकमेव देश असेल जाे काॅम्पुटरवर राशी-भविष्य, व जन्म कुंडलीचे भाकीत वर्तवताे! यालाच आपण देश बदलताेय म्हणायचं का? त्याच भारतात एक तरुण धार्मिक दंगे घडवण्यासाठी किंवा सामाजिक असंताेष निर्माण करण्यासाठी "नालासाेपारा" येथे घरातच स्पाेटके तयार करतांना पकडला जाताे. दिल्लीतील ज्या रामलीला मैदानावर ऐकेकाळी तत्कालीन दिवंगत माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्रीनी "जय जवान..जय किसान" अशी घाेषणा दिली हाेती, आज त्याच ठिकाणी शेतकरी बांधवाना उपाेषण करण्याची वेळ आली. त्याच बराेबर काही कर्मठ मुठभर मनुवाद्यांनी भारतीय राज्यघटना जाळण्याचा पर्यंत्न केला, तसेच देशातील विचारवंताना, पत्रकारांना गाेळी झाडुन संपवल जातयं. हे सर्व देशात घडत असताना आपण देश बदलताेय आणि पुढे जाताेयं चे गाणं कसे काय वाजवू शकताे? ज्या स्वातंत्र्यासाठी संपुर्ण देशातील सर्व जाती-धर्मातील व समाजातील लाेकांनी एकत्र येऊन ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला, रक्त सांडले, शिक्षा भाेगली, बलिदान दिले, आणि ताेच स्वातंत्र्य मिळालेला भारत देश आज ऐकमेकांना संपवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे! आणि "मेरा देश बदल रहा हैं... आगे बढ रहा हैं...!" च्या 'पुळचट', 'भाबड्या' जाहीराती ऐकवुन देशाची दिशाभुल करत आहे.
      मानव विकास निर्देशांकचा (HDI) जर आपण विचार केला तर भारत आज जगाच्या तुलनेत फार पाठीमागे आहे. फक्त (GDP) स्थुल देशाअंतर्गत विकासाचे "फुगीर" आकडे जगाला दाखवण्यातच आपण धन्यता मानताे! दुसरीकडे देशात ७०% पेक्षा आधिक लाेकांना गरजे पुरते दाेन वेळचे खायला अन्न नाही, निवारा, राेजगार नाही थाेडक्यात सांगायचे म्हणजे देशात गरजेच्या पायाभुत सुविधा ऊपलब्ध नाहीत, आणि आपण "देश बदलताेय, पुढे जाताेय...!" ह्या जाहीरातीेचे गाणं वाजवत फिरताेय! परंतु आजच्या या "घातक बदलाला" काेण..? थांबवेल यावरच मुळात प्रंश्नचिंन्ह (?) आहे.
                                                                               ✒ सतीश इंगळे.


                       Article by Satish Ingle.
                               
   

Sunday, December 2, 2018

लोकसभा निवडणुक- २०१९ आणि हाैसी कार्यकर्ते.

       पुढील काही दिवसात निवडणुक आयाेगाकडुन अधिकृतरीत्या निवडणुकांच्या तारखा जाहीर हाेतील, आणि २०१९ मधील  लाेकसभा निवडणुकीचे खर्याअर्थाने बिगुल वाजेल! आणि दुसरीकडे स्वघाेषीत पुर्णवेळ पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते! म्हणवुन घेणारे पाठीचा कणा अगदी ताट करुन पुर्णपणे जागी झालेले असतील! हेच हाैसी कार्यकर्ते
इतर वेळी म्हणजेच पुढील निवडणुक येईपर्यंत पाच वर्षासाठी ते पुन्हां अदृश्य झालेले असतात! काेमात गेलेले असतात! त्यांचा 'चेव'(जाग) हा फक्त निवडणुकां जाहीर झाल्यापासुन ते निकाल लागेपर्यंतच टिकुन असताे! या त्यांच्या सुवर्णकाळात बगळ्याच्या मानेप्रमाने मान ताट करुन ते किती पक्षांचे ऊपारणे (रुमाल) गळ्यात घालून घेता येतील? किती बाटल्या रिचवता येतील? आणि खिशे कशा पद्धतीेने गरम करता येतील? याच धडपडीत ते असतात किबंहुणा हाच त्यांचा मुख्य अंजेडा असताे.
      आपल्या देशात "कार्यकर्ता" हाेणे खुप साेपी गाेष्ट आहे! एखाद्या काका, दादा, नाना, भाऊ, ताई... ईत्यादी. अशा प्रकारे "जड शब्दांचे" लेबल लागलेल्या लाेकप्रतिनिधीच्यां मागे-मागे काही दिवस हात जाेडत घरच्याच भाकरी खाऊन फिरायचं! किंवा खुप झालं तर गर्दीतुन एखादी संधी मिळाल्यावर माेबाईल मध्ये बळजबरीने साेबत सेल्फी फाेटाे काढुन 'फेसबुक' वर अपलाेड करायचा! किंवा इतर समाज माध्यमावर फाेटाे शेअर करायचा! चालु वर्तमानकाळात "इंटरनेट-कार्यकर्ते" ही आपल्याकडे काही कमी नाही! त्यात जर त्याच्या फाेटाेला जर चुकुन लाईकस मिळाल्या आणि इतर "इंटरनेट सब-कार्यकर्तायांकडुन" स्तुतीच्या कमेंटस मिळाल्या तर त्याचा आनंद गगणात मावेनाशी हाेताे! म्हणजेच त्याला सर्वकाही मिळल्याचे समाधान मिळते! त्यानंतर झालाच समजा ताे पु.वे.का (पुर्ण वेळ कार्यकर्ता). आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे आपल्याकडे कार्यकर्ता हाेण्यासाठी कुठल्याच वयाचे बंधन नाही! मग ताे एखादा विद्यार्थी असाे किंवा नाेकरदार, व्यवसायीक, शेतकरी गळ्यात ऊपरणं(रुमाल), हातात झेंडा आणि समाेरुन 'कि'... म्हटल्यावर याने फक्त ....'जय' म्हणायचं झालाचं समजा पक्ष कार्यकर्ता! थाेडा विचार करा कार्यकर्ता जर तरुण असेल! तर ताे निश्चीतपणे सकाळ पासुन ते संध्याकाळपर्यंत कमीतकमी घरात ५०० रु कमवून आणु शकताे! परंतु ताे २०० रुपड्याची दारु पिण्यासाठी दिवसभर पक्ष कार्यकर्ता म्हणुन कुणाच्यातरी पाठीमांगे थाटात मिरवत असताे!
      निवडणुकां काय येतात आणि जातात हि तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सरकार कुणाचंही असाे लाेकप्रतिनिधीवर त्याचा फारसा काही परिणाम हाेत नाही, सत्ता आली तर सत्तेत बसतात, नाहीतर विराेधात बसतात. त्यांच काहीच आडत नाही, कारण त्यांनी व्यवस्थाच तशी आखुन ठेवलेली असते! या ठिकाणी फरक पडताे ताे सर्वसामान्यांना म्हणजेच कार्यकर्त्यानां कार्यकर्ता हा नेहमीच सर्वसामान्य असताे यात शंका नाही, आजवरचा इतिहास आहे लाेकप्रतिनिधीनीं सर्वसामान्यांनाचा म्हणजेच कार्यकर्तायांचा नेहमीच कामापुरता 'ढाली' सारखा वापर करुन घेतलेला आहे. कदाचित अनेकांना हे पचनी पडणार नाही परंतु हिच वस्तुस्थिती आहे. २०१९- लाेकसभा निवडणुकीचे व परिणामाचे अर्थात निकालाचे 'रंग' या वेळी जरा वेगळेच बघायला मिळतील यात दुमत नाही, त्याच बराेबर या निवडणुकीला "पैसाच्यां नाेटाचां" रंगही तेवढाचं प्रमाणात बदलेला आहे हे सुद्धा विसरुन चालणार नाही! तेव्हां या निवडणुकीतील "आकर्षित रंग" बघुन कार्यकर्तायांच्या डाेळ्यांचे रंग बदलु नये हिच खरी परीक्षा ठरेल!
   शेवटी या लेखच्या माध्यमाद्वारे "हाैशी कार्यकर्तायांना" एक "बाळ-कडु" देणे महत्वाचे वाटते! ते म्हणजे कुठल्याही निवडणुकांमधील 'रंग' हे क्षणिक असतात, क्षणभंगुर असतात, तेव्हा आता तरी सुधारून घ्या गड्यांनो.
                                                                            ✒ सतीश इंगळे.


Article by Satish Ingle.

Tuesday, November 20, 2018

साेशल माध्यमांचे विखारी व्यसन!!!

       विसाव्या शतकात इंटरनेटची सुरवात १९६९ मध्ये अमेरिकेतील कॅलिफाेर्निया विद्यापीठात सर्वप्रथम काही माेजक्याच संगणका दरम्यान झाली. त्यानंतर पुढे इंटरनेट सेवेत अधिक संशाेधन हाेऊन त्याचा विस्तार वाढत गेला, आणि १९९१ मध्ये वर्ड-वाईड-वेब (www) इंटरनेटचे जाळे जगभर पसरले आणि संपुर्ण जग इंटरनेटच्या माध्यमाद्वारे आपआपसात एकत्र आले, संवाद वाढला, विचारांची देवाण-घेवानाला प्रारंभ झाला त्यालाच आपण आज जग जवळ आलं अस म्हणताे. भारतात सर्वप्रथम इंटरनेटला सुरवात १९८६ "ऐज्युकेशन्ल रिसर्च नेटवर्क" (ERNET) मध्ये झाली. त्यानंतर १९९५ पासुन इंटरनेट सेवा सार्वजनिकरित्या संपुर्ण भारतात प्रसारित करण्यात आली.  पुढे अनेक "साेशल माध्यमे" उदयास आली उदा. Orkut, Facebook, Twitter ,WhatsApp Instagram ईत्यादी. सुरुवातीच्या काळात या सर्वांशी फार कमी लाेक जाेडले गेले हाेते परंतु, आजच्या घडीला स्मार्टफाेनच्या युगात असंख्य लाेक  साेशल माध्यमांशी जाेडले गेले आहेत. आज भारतात सुमारे ४० काेटी पेक्षा अधिक लाेक साेशल माध्यमांचा वापर करतात. भविष्यातील पुढील काही दशकात त्याचे स्वरुप खुप माेठे असणार आहे यात शंका नाही.
       साेशल माध्यम मुळात एक संवाद, विचार व परिचयाचे एक हक्काचे व्यासपीठच आहे! आणि ज्ञानाचेे भंडार! जगाच्या पाठीवरील कुठलाही निवाशी एकमेकांशी जाेडला जावा, एकत्र यावा साेशल माध्यमांचा हाच मुख्य उद्देश हाेता आणि आहे. परंतु आज अनेक लाेक किवां अनेक देश साेशल माध्यमांद्वारे निवडणुकीचा प्रचार व जाहिरात करतात, व त्याचा वाेट बॅंक साठी पुरेपुर वापर करतानां दिसतात. गेल्या मागील दशकात साेशल माध्यमाद्वारे जगात अनेक ठिकाणी राजकिय, सामाजिक, आर्थिक विषयांशी संबधीत  यशस्वी चळवळी झालेल्या आपण बघितल्या. त्याच बराेबर हिसंक काही आंदोलनेही बघीतले. आज साेशल माध्यमांचा दुधारी शस्त्र म्हणुन वापर हाेतांना दिसताे. अलिकडेच आपण अनेक ठिकाणी पाेलीस प्रशासनाने इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद केल्याचे बघितले, त्याचे कारण, साेशल माध्यमाद्वारे सामाजातील काही समाजकंठक जाती- धर्माच्या नावाखाली काही आक्षेपार्ह मजकुर पसरवुन लाेकांचे डाेके भडकवतात, साेशल माध्यम वापरकर्तेही त्याची खरी खाेटी पडताळनी न करता मेसेजेस इतरांना आहे तसा फाॅरवर्ड करतात, परिणामी सामाजिक अस्थिरता निर्माण हाेते व प्रशासन व्यवस्था ठप्प हाेते. भारतात 'सायबर क्राईम' कायदा अस्थित्वात आहे त्यानुसार शेकडाे गुन्हें दरवर्षी दाखल हाेतात परंतु हवी तशी किंवा युराेपीयन राष्ट्रांप्रमाने जलद अंमलबजावणी व गांभीर्यता त्यात दिसुन येत नाही.
        आज भारतात शहरापासुन ते खेड्यांपर्यंत साेशल माध्यमांचा वापर हाेताे, खरं म्हणजे ही चांगली बाब म्हणता येईल! जगा बराेबर चालण्यासांठी या गाेष्टी आवश्यक आहे. फक्त या ठिकाणी गरज आहे ती साेशल माध्यमांचा कसा? आणि किती? वापर करायचा? ते जाणुन घेण्याची. भारताला जगात आज 'तरुणांचा देश' म्हणुन ओळखले जाते. या सर्व तरुण मनुष्यबळाचा देशाच्या विकासात प्रत्यक्ष याेगदान महत्वाचे असतांना शाेकांतिका अशी आहे की, भारतातील ७०% तरुण साेशल माध्यमांच्या "विखारी व्यसना" मध्ये अडकुन पडला आहे! त्याच्या चक्रविवातुन बाहेर पडणे त्याला कठीण झाल्याचे कुठे तरी दिसून येते उदाहरणार्थ, एखादया तरुणाने Facebook वर किंवा Instagram वर एखादी पाेस्ट अपलाेड केली असेल किंवा फाेटाे टाकला असेल तर ताे त्याला किती Like's मिळतात? व किती कमेंट्स मिळतात? यातच ताे त्याच्या दैनंदीन दिवसातील जास्तीत जास्त वेळ घालवताे! आणि अख्खा दिवस कधी निघुन गेला? याचा ताळमेळही त्याला लागत नाही! दिवस काय कधी-कधी तर रात्रही निघुन जाते! या सर्वांचा जर आपण गंभीरपणे विचार केला तर, भारताचे उज्वल भविष्यच धोक्यात आहे! असेच म्हणावे लागेल तेव्हा लेखात वर उल्लेख केल्याप्रमाने "विखारी व्यसन" साेशल माध्यमांना आपण का? म्हणू नये.
                                                                                ✒ सतीश इंगळे.
 

                     Article By Satish Ingle.
                          

Saturday, November 3, 2018

स्टॅच्यू ऑफ युनिटी

      नुकताच हाेऊन गेलेल्या भारताचे लाेहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंती निमित्त पंतप्रधान    श्री. नरेंद्र माेदी यांनी १८२ मिटर उंच असलेला भव्यदिव्य पुतळ्याचे अनावरण करुन, ताे त्यांनी देशाला समर्पित केला. त्या द्वारे आपण देशाला तसेच जगाला एकतेचा संदेश देऊ पाहताेय! खरं म्हणजे सरदार पटेल यांचे भारताच्या ऐतिहासिक संस्थानांचे स्वंतत्र भारतात विलनिकरण करुन घेण्यात फार माेठे याेगदान आहे. कदाचित! त्यामुळेचं आपण आज अखंड भारताचा नकाशा डाेळ्यांनी पाहु शकताे, नाहीतर कल्पणा करणेही अवघड हाेते!
   जगातील सर्वात उंच पुतळा भारतात ऊभारुन आपण आज एक नवा विक्रम केला! त्याला खर्च किती आला? उभारणीला किती कालावधी लागला? काेणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला? काेणत्या कंपणीला काम दिलं गेलं? काम करायला किती देशाच्या अभियंते हाेते? त्यामुळे स्थानिक रहीवाशांना राेजगार उपल्बध हाेईल!, पर्यटक येतील, वगैरे.. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या निश्चितपणे दैनिक वृत्तपत्रे, व इतर माध्यमातुन वाचायला, बघायला मिळाली असेलचं! कारण त्याची मार्केटींग अगदी उत्तमप्रकारे केली गेलेली आहे,(उदा. जनधन याेजने प्रमाणे!) यात तिळमात्र शंका नाही! म्हणुन या ठिकाणी त्याचा उल्लेख करणे उचित ठरणार नाही!
     महत्वाचा मुद्दा हा आहे, जगातील ज्या विकसीत देशांना आपण आज सरदार पटेलांचा १८२ मिटर उंचीचा भव्य पुतळा उभारुन उंचीत मागे टाकले! आणि पुतळा उभारणीत जगात नंबर एकवर जाऊन पाेहचलाे! परंतु या ठिकाणी आपल्याला एका गाेष्टीचा विसर पडलेला दिसताे, जगातील ज्या-ज्या देशाला आपण पुतळ्यांच्या उंचीत मागे टाकले, त्या सर्वच देशाच्या आर्थिक विकासाची (GDP) उंची भारता पेक्षा किती तरी पटीने जास्त आहे. म्हणजेच त्या देशांनी सर्व प्रथम संपुर्ण आर्थिक विकास केला, किंवा सर्वांगीन विकासाला महत्व दिले आणि नंतर उंच पुतळे उभारलेत, म्हणुनच ते आज जगातील प्रमुख विकसीत राष्ट्रे आहेत आणि महासत्ता आहेत.
     या ठिकाणी उंच पुताळे उभारण्यास मुळिच विराेध नाही, परंतु इथे आज देशाची खरी गरज काय आहे, हे समजणे महत्वाचे आहे. म्हणजेच देशातील जिवंत माणसांचे जिवंत असुनही 'मेलेले पुतळे' हाेऊ नये! हिच अपेक्षा.
                                                                                ✒ सतीश इंगळे.
 


                        Article By Satish Ingle.
                             
               www.marathiearticle.blogspot.com

Tuesday, October 30, 2018

मित्राैं, पिछले ७० सालाें मैं?

  भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र माेदी सत्येत आल्यापासुन एकचं वाक्य जास्त बाेलताना दिसतात! "मित्राैं...पिछले सत्तर सालाें मैं...??" एव्हांना ते सभेत भाषनाची सुरवात करणे असाे, किंवा साेशल माध्यमांवर व्यक्त हाेणे असाे, पंतप्रधान नेहमीच सुरवात याच वाक्यापासुन करतात. यातुन ते नक्की मागील सत्तर वर्षातील काॅग्रेस पक्षाला हिशाेब मागतात.? कि, उपदेश देतात! हेच काही कळायला मार्ग नाही. मागील सत्तर वर्षात जर काहीच प्रगती झाली नसती, तर आज जाे काही भारत आपण बघताेयं किंवा अनुभवताेयं असा ताे असता का? किंवा जी काही प्रगती देेेशात झाली ती काय फक्त मागील पाच वर्षातचं झाली का? या प्रश्नांंच उत्तर ईयत्ता पाचवीतील विद्यार्थी सुद्धा देेेेतील! परंतु याचा अर्थ असा मुळीच हाेत नाही, कि मागील सत्तर वर्षात काॅग्रेस पक्षाने देशाला १००% सुजलाम्-सुफलाम्  केलयं! मात्र त्यांनी त्यासाठी प्रयत्न नक्कीचं केलेत हे  सुद्धा नाकारुन चालणार नाही. याचीही दखल या ठिकाणी घेणे अगत्याचे ठरेल. उदा. १९६६-६७ मध्ये पहिली हरीत क्रांतीला सुरुवात असाे, किंवा १४ मे १९७४ मधील पाेखरण येथील पहिली अणुचाचणी, जागतिक शीतयुद्धांत भारताची निर्णायक भुमिका, किंवा अलिकडील १९९१-९२ चे आर्थिक उदारीकरणाचे धाेरण असाे ईत्यादी. अनेक महत्वाची निर्णय हे मागील सत्तर वर्षातच घेण्यात आलेली आहेत म्हणुनचं आज आपण भारत महासत्ता हाेण्याचे प्रत्यक्ष स्वप्न रंगवु लागलाे. याची जर आपण आपल्या कलिग राष्ट्रांशी तुलना करुन पाहीली तर निच्छित आपल्या मागील सत्तर वर्षाची कल्पणा येईल यात शंका नाही.
   १९८४ साली अमेरिकेने भारताला सुपर संगणक देण्यास नकार दिला तेव्हां, तत्कालीन दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधीनी सुपर संगणक निर्मितीची याेजना आखुन १९९१  मध्ये अमेरिकाच्या नाकावर टिच्चुन "परम" नावाचा स्वदेशी बनावटीचा पहिली सुपर संगणक बनवला, व भारतात माहिती तंत्रज्ञानाला सुरवात झाली, त्यालाच आपण आज आयटी-युग म्हणताे. याच आयटी-युगाला ऐकेकाळी म्हणजेच १९८४ दरम्यान सद्याच्या सत्तारुढ भाजप पक्षाने संगणकला प्रत्यक्ष रित्या जाहिर विराेध केला हाेता. आणि हे सर्व विसरुन भाजप पक्ष आज डिजिटल इंडियावर भाषने देतानी दिसून येतो , त्याच संगणकाच्या मांध्यमाद्वारे भाजप नेते साेशल मिडियावर (Facebook, WhatsApp, Twitter) वर पक्षाचा प्रचार करुन आपले ज्ञान पाझरवतांना दिसतात, आणि मागील सत्तर वर्षात काहीच झाले नसल्याचा खाेेटा आव आणतात. हे म्हणजे सर्व  हस्यासपद व आर्श्चायकारक म्हणावं लागेल!
    २०१४ साली अमाप/अगणित आश्वांसने देऊन भाजप पक्ष सत्तेत आला, त्यातील एकही आश्वासन तडिपार नेल्याचे या मावळत्या पाच वर्षात दिसले नाही! फक्त "ढिगभर" याेजनांचा जाहीर ऐल्गार करुन, चालु-घडामोडीचा मुलांचा अभ्यास तेवढा वाढवून ठेवला! असो, तासा-तासाला "ठरावीक लाभार्थीच्या"  जाहिराती दाखवुन, व काहीप्रमाणात रस्ते बांधुन जणतेची पाेटं भरत नसतात! नाेटबंदी करुन जुन्या नाेटा किती  RBI कडे परत आल्या? व नविन किती छापल्या गेल्या? काळा पैसा किती परत आला? या सर्वांचा हिशाेब करता-करता सत्तारुढ सरकारची दमछाक झाली, त्यातच एक पंचवार्षीक संपत आली, यात मात्र भारतीय अर्थव्यवस्तेचा कणा माेडुन, अर्थव्यवस्था पार काेमात नेवुन ठेवलीय.
   आज माननीय. पंतप्रधान श्री नरेंद्र माेदी मागील सत्तर वर्षात काहीच झालं नाही! व त्याचा हिशाेब विचारतात, परंतु  पुढील वर्षी २०१९ मध्ये मागील पाच वर्षात (२०१४-१९) दिलेल्या आश्वासनांचा हिशाेब जर जनतेनी त्यांना विचारला तर माननीय. पंतप्रधान यांना आर्श्चाय वाटु नये म्हणजे  झालं.
 
                                        
          ✒ सतीश इंगळे.


_____________________________________________
                     
                    Article By Satish Ingle.  

                        

  

Saturday, October 27, 2018

वंशाचा दिवा!

     एक दिवस संध्याकाळची वेळ हाेती लगभग काहीच मिनिटांनी अंधारच हाेणार हाेता, मला काही पुस्तके बाजारातुन आणायची हाेती, दुकाणे बंद हाेतील म्हणुन जरा मी घाईतचं रुमच्या बाहेर पडलाे. साधारणं चालत शंभर ते दिडशे मीटर अंतरावर मी गेलाे असेल, तेवढयात माझ्या विराेधी दिशेने एक आजी तावातावानं येत आसल्याची दिसली, आजीचं वय अंदाजे ७० ते ७५ दरम्यान असावं! तिच्या डाेक्यावर एक कुरतडलेलं एक गाठाेड हाेत, आणि हातात एक पिशवी, तिच्या पायात चप्पलही नव्हती, तिचा ताे अवतार बघता मी चालतांनी थाेडं थबकलाे! तेवढ्यात तिच्या हातातील पिशवीचा बंद तुटुन ती खाली पडली, त्यातील पडलेले तिचे कपडे ती घाईघाईत भरत हाेती मी जवळ जाऊन म्हणालाे आजी मी मदत करु त्यावर तिची काहीच प्रतिक्रिया आली नाही, ती स्व:तहाचं बडबडत हाेती "नवसाचा दिवा हाेता ना" अस काही तरी क्षणभर माझाही गाेंदळ ऊडाला! थाेडया वेळाने आजी बाेलली "देलं घराच्या बाहेर काढुन तिनं अ्न त्यानं...पण, ताे मह्या नवसाचा हाेताना त्याला लहानाचा माेठा केलाना...वंशाचा दिवा हाेताना" अशा प्रकारे ती बरचं काही बडबडत हाेती.
    आता माझ्या लक्षात आलं हाेतं, आजीला तिच्या एकुलत्या एक मुलाने स्व:तच्या आईलाचं घराच्या बाहेर केलल हाेत, वेगळं केल हाेत! मी आजीला थोडं दबक्या आवाजात विचारले, आजी तुम्हीं आता कुठं जाणार? त्यावर आजी रागात म्हणाली " जाईल म्हंसणात" आणि ती पुढे निघुन गेली.
     आपल्या भारत देशाला फार माेठी प्राचीन संस्कृती व परंपरा लाभलेली आहे वसुधैव कुटुम्बकम् यातच आपली सामाजिक, काैटंबिक मुळे घट्ट रुजलेली आहेत. वसुधैव कुटुम्बकम संदेश भारतीयांनी सर्व जगाला दिला, म्हणजेच सर्व विश्व एक परिवार आहे, एक कुटूूंब आहे. असा त्याचा सरळ साधा अर्थ हाेताे. परंतु आज त्याच भारतात कुटंब-परिवार विभक्त हाेतांनी दिसतात! रक्ताची नाती तुटतांनी दिसतात! खर म्हणजे हे आपल्या सर्वांच दुर्भाग्यच म्हणावं लागेल!
     शेवटी एवढचं सांगेन आयुष्य हे खुप सुंदर आहे क्षणभंगुर आहे फक्त ते जगण्यासाठी अनुभवण्यासाठी आपल्याच रक्तांच्या जिवंत माणसांची कुटुंबाला आज खरी गरज आहे.
                                                     
                                                           - सतीश इंगळे.
     **************************************
                                       Article By Satish Ingle. 


गाजरांचा पाऊस!

  गाजरांचा पाऊस! शीर्षक बघुनच अनेकांच्या भुव्या निश्चितच उंचवल्या असतील! कारण ते एक अतिशाेक्तीच उदाहरण आहे. या ठिकाणी त्याचा शब्दशहा अर्थ न...

Copyright Ⓒ 2022, Marathi e-Article All Rights Reserved.